Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहे. आता आपली एकजूट ठेवा, काही झाले तरी आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मराठा समाजाच्या पदरामध्ये आरक्षण पडल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला.

0
Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : श्रीरामपूर : आंदोलनाच्या काळामध्ये शांततेत आंदोलन करा, कुठेही हिंसा करु नका, आपल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाला गालबोट लागता कामा नये, आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहे. आता आपली एकजूट ठेवा, काही झाले तरी आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मराठा समाजाच्या पदरामध्ये आरक्षण पडल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला.

Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर सुद्धा मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

हे देखील वाचा : आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट

श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाची लढाई आपण ८५ टक्के जिंकलो आहे. आता लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. या काळात कुठेही मराठा ओबीसी वाद होता कामा नये, आता गाफील राहू नका, आरक्षण मिळेपर्यंत कुणाचेही झेंडे हातामध्ये घेऊ नका, आजपर्यंत त्यांचेच झेंडे आपण हातामध्ये घेतले त्यांनी आपल्यासाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या शांततेच्या आंदोलनामुळेच शासनाच्यावतीने सन १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ पर्यंतच्या नोंदी पाहाण्याची मोहीम सुरू झाली आहे. सुमारे ७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे सुमारे पावणेदोन कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. अजून नोंदी पाहाण्याचे काम सुरुच आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता

आरक्षणावर आमच्या मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना १२ ते १३ टक्के मागास घोषित केले होते परंतु तरीही मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही. सुमारे ७० वर्षापासून या नोंदी दडपून ठेवण्याचे पाप कुणी केले, हे लवकरच जनतेसमोर येणार आहे. जेव्हा आरक्षणाचं वाटप झालं तेव्हा मराठा समाजाने कुणालाही विरोध केला नाही, आपल्या हक्काचंही इतरांना देऊ केलं, आपल्या मुलाच्या डोळ्यामधील पाणी सोडून इतरांच्या मुलांच्या डोळ्याचं पाणी मराठा समाजानं पुसलं, आपल पोर उपाशी पोटी ठेवून इतरांच्या पोटाला घास दिला. परंतु आता घशापर्यंत आलयं. आता नाही तर कधीही नाही, त्यामुळे आता शांततेच्या मागनि आंदोलन सुरू ठेवा, जाळपोळ कुठेही करू नका, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. १ डिसेंबरपासून प्रत्येक गावामध्ये पूर्ण ताकदीनिशी साखळी उपोषण सुरू करा, आरक्षण मिळेपर्यंत कुणाचाही झेंडा हातामध्ये घेऊ नका, असा निर्वाणीचा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here