Manoj Jarange Patil : नगर : मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पदयात्रेचे सकल मराठा समाजाकडून (Maratha society) जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी (ता. नगर) येथे समारे १५० एकरवर भाेजन, पार्किंग तसेच मुक्कामाची जाेरदार तयारी करण्यात आली आहे. साधारणतः ही मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) दिंडी रविवार (ता. २१) सायंकाळी ७ च्या सुमारास नगरमधील बाराबाभळी येथे येणार असून २५ लाख मराठे येण्याचा अंदाज मराठा सकल माेर्चाचे गाेरख दळवी यांनी सांगितले.
नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरण; ३०० मालमत्ता धाेक्यात, घरे खाली करण्यास सुरूवात
प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवक मदतीला (Manoj Jarange Patil)
पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी येथे मराठा समाजाच्या वतीने नियाेजन करण्यात आले आहे. यावेळी १०० डाॅक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवक मदतीसाठी नगर शहरात येणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा अंतरवली सराटी शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, नगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. .
हे देखील वाचा : नगरपंचायतची रिक्त पदे तत्काळ भरा; अन्यथा तहसीलमध्ये उपोषण
मोर्चेकरांच्या सोयीसाठी नियोजन बैठक (Manoj Jarange Patil)
मराठा मोर्चा हा नगर जिल्ह्यातून जाताना नगर-पुणे महामार्गावरील सुपे या परिसरात या मोर्चाचे दुपारचे भोजन होणार आहे. यादृष्टीने तयारी सुरू आहे. मोर्चेकरांच्या अन्न, पाणी, व इतर सोयीसाठी नुकतीच पारनेर व सुपा येथे नियोजन बैठक घेण्यात आली होती. यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा पाणी टॅंकर उभे करणे, मोर्चा बरोबरील टॅंकर रोड लगतच्या विहिरी, बोरवेलवरुन भरण्याची सोय करणे, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करणे, त्यांना बसण्यासाठी जागा स्वच्छ करणे, जास्तीत जास्त स्वयंसेवक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, मोर्चात महिला मोर्चेकरी असल्याने आपल्या परिसरातील महिला स्वयंसेवक तयार ठेवणे. मोर्चाचे स्वागत, जेवण, पाणी आदी गोष्टींसह मोर्चा शिरुर पुणे जिल्ह्यातील हद्दीत सुरक्षित पोहोच होईल, आदी नियोजन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : देशात मोदी व राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मोर्चाचा मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं
२० जानेवारी सकाळी ९ वाजता अंतरवलीमधून निघणार
२० जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात
२१ जानेवारी दुसरा मुक्काम, बारा बाभळी (अहमदनगर)
२२ जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
२३ जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, पुणे
२४ जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
२५ जानेवारी सहावा मुक्काम – वाशी, नवी मुंबई
२६ जानेवारी सातवा मुक्काम- आझाद मैदान आंदोलन स्थळी पोहोचणार, आमरण उपोषणालाही सुरुवात