Manoj Jarange Patil : साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढल्याने मनोज जरांगे पाटील आज रायगडाच्या दिशेने निघाले आहेत.

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुकारलेल्या आंदाेलनामुळे मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी अधिसूचना काढायला लावली. त्यामुळं मराठा आंदाेलन यशस्वी झालं आहे, असे मराठा माेर्चाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर, मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले, अशी उपरोधिक टीका मराठा आरक्षण विरोधकांनी केली. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी साेशल मीडिया (Social media)वर शायनिंग मारण्यापेक्षा तज्ज्ञ लाेकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं, असे चोख प्रत्युत्तर विराेधकांना दिलं आहे.

Manoj Jarange Patil

हेही वाचा : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगेचा इशारा

जरांगे रायगडच्या दिशेने (Manoj Jarange Patil)

सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढल्याने मनोज जरांगे पाटील आज रायगडाच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी मनाेज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ”एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं. सरकाने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेवर सरकारने १५ दिवसांत लोकांचं म्हणणं मागितलं आहे. मराठा आरक्षणाची माहिती असलेले, या विषयातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, वकील, आरक्षणातील खाचखळगे माहीत असलेल्या लोकांनी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला आहे. नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगेसोयरे शब्दामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे.

Manoj Jarange Patil

नक्की वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

छगन भुजबळांचा हा धंदाच (Manoj Jarange Patil)

छगन भुजबळांनीही ओबीसी समाजातील तज्ज्ञांना हरकती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. छगन भुजबळांचा हा धंदाच आहे. मराठ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे, अशी आमची नियत आहे. परंतु, लोकांच्या अन्नात माती कालवण्याची नियत आमची नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. समाजाला कुठे काही अडचण आली, तर मी आंदोलनासाठी तयार आहे”, असा इशाराही त्यांनी दिला. तह झालेला नाही. मराठे जिंकून आले आहेत. कायदा झालेला आहे. सगेसोयरे संदर्भातही कायदा झाला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही तरी अडचण नाही. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट राहा. एकत्र या”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

Manoj Jarange Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here