Manoj Jarange Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil ः मनोज जरांगे पाटील यांच्या उपाेषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. नाकातून रक्तस्त्राव हाेत आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह सहकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांना शासनाचे शिष्टमंडळ भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. 

Manoj Jarange Patil

हे देखील वाचा: उठता, बसताही येईना; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, गावकऱ्यांसह सहकारी चिंताग्रस्त

उपाेषणाचा पाचवा दिवस (Manoj Jarange Pati)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपाेषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. नाकातून रक्तस्त्राव हाेत आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह सहकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. सरकारचे नुसते नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil

अवश्य वाचा : भाजपचं हिंदुत्त्व घरं पेटवणारं; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

उपाेषण मागे घेण्याची विनंती (Manoj Jarange Pati)

Manoj Jarange Patil

दरम्यान, जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी नुकतेच विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी सरकारला पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here