Manoj Jarange Patil : …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil : …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मंगळवारी (ता. २०) सरकारने विशेष अधिवेशन (Special Session) बाेलवले आहे. त्यामुळे सर्व पक्षातील मराठा आमदार, मंत्र्यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे, नाहीतर ते मराठा विरोधी ठरतील. करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.

हे देखील वाचा: पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार? : आमदार नितेश राणे

अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषद

 
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकारला सगेसोयरेची अंमलजावणी करावी लागेल, त्यांना चार महिन्यांचा वेळ सगेसोयऱ्याची अंमबजावणीसाठी दिले होते. त्यामुळे २० तारखेला सरकारची भूमिका कळेल, अन्यथा आमची देखील २१ तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरली असल्याचा” इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

नक्की वाचा: शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध’: एकनाथ शिंदे

स्वतंत्र आरक्षण हा श्रीमंतांचा हट्ट (Manoj Jarange Patil)

जरांगे म्हणाले, “उद्या जो कायदा होईल, त्याचा आनंद व्यक्त केला जाईल. मोजक्या लोकांना स्वतंत्र आरक्षण हवे आहेत, मात्र, करोडो मराठ्यांना ५० टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून आरक्षण हवं आहे. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाची अंमबजावणी सरकार करणार आहे की नाही, हे २० फेब्रुवारीला लक्षात येणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मागसवर्गीय आयोगाचं अहवाल आला. पुढील आंदोलनाची दिशा आम्ही अधिवेशन झाल्यावर ठरवणार आहोत. त्यामुळे आमदारांनी उद्या अधिवेशनात आवाज उठवावा आणि ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, अशी मागणी मराठा आमदारांनी अधिवेशनात मांडावी. सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजले जाईल. स्वतंत्र आरक्षण हा श्रीमंतांचा हट्ट आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here