Manoj Jarange Patil : नगर : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारने सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी येत्या २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको (Block the way) करण्याचा इशारा (Warning) जरांगेंनी दिला आहे.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर
जरांगे पाटील म्हणाले (Manoj Jarange Patil)
” मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी उद्यापासून निवेदन द्यावे. २४ तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तो रोको करावा.
हे देखील वाचा : शंभू सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये झटापट;अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
सगळं भान ठेवून आंदोलन करायचं (Manoj Jarange Patil)
दरम्यान, जरांगे यांनी साल्हेर किल्ल्याजवळ ताफ्यात ब्रेक फेल झालेले पिकअपसारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, यावरून गंभीर आरोप केले. त्या घातपातासाठी कार्यकर्ता कोणी पाठवला होता, ते मला माहिती आहे, गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे, सखोल चौकशी करावी. नाहीतर मला नाव सांगायची वेळ येईल, असेही जरांगे म्हणालेत. आपण आपलं गाव सांभाळायचं, कोणी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं नाही. आंदोलन गावात असल्याने घराला कुलूप लावून लोक आंदोलनाच्या केंद्रावर उपस्थित राहू शकतात. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे, सगळं भान ठेवून आंदोलन करायचं.