Manoj Jarange Patil : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा

Manoj Jarange Patil : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी घेऊन हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. आज सकाळपासूनच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. जरांगे २६ जानेवारी रोजी मुंबईत उपोषणाला (Hunger strike) सुरूवात करणार आहेत. दरम्यान, उद्या जरागें यांच्या पदयात्रेचा नगरमधील बाराबाभळी येथे दीडशे एकरावर मुक्काम राहणार आहे. यासाठी २५ लाख मराठे येणार असल्याचा अंदाज आहे.

हे देखील वाचा : अखेर ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी

मार्गावर पाेलीस बंदाेबस्त तैनात (Manoj Jarange Patil)

पदयात्रा मार्गावर प्रत्येक पाच किलाेमीटरवर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुंबई पाेलिसांकडून नुकतीच नगरमध्ये पदयात्रेची पाहणीही करण्यात आली आहे. 
नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाबळी येथे रविवारी सायंकाळी सभा होणार आहे. या सभेसाठी दीडशे एकरांवर सपाटीकरण करून स्वच्छता करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातून दीडशे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. दहा जेसीबी व पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीन सपाट करण्यात येत आहे. मध्यभागी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे.

नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा

२५ लाख मराठे येण्याचा अंदाज (Manoj Jarange Patil)

पदयात्रेतील मराठा बांधवांसाठी जिल्ह्यातून १४ लाख फूड पॅकेज व १५ लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे ११० टँकर असणार आहे.  याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी पुलाव, शिरा तयार केला जाणार असून कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी सकल मराठी समाजातर्फे घेण्यात येत आहे. पदयात्रेतील मराठा बांधवांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधे पुरवण्यात येणार आहे. २५ बेडचे फिरते रुग्णालय या मार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहे, असे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here