Manoj Jarange Patil : आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला जागा दाखवणार: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला जागा दाखवणार: मनोज जरांगे पाटील

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : पारनेर : प्रत्येक जिल्ह्यातून हजारो निवडणूक फॉर्म भरून आमच्या आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला जागा दाखवणार आहोत. आम्ही आमच्या मराठा जातीच्या आमदार खासदारांना मोठे केले, पण त्यांनी जातीलाच सोडून दिले. मराठा समाजाच्या जिवावर मोठे झाले, तेच राजकारणी आता मराठ्यांचे विरोधात बोलत आहेत. आता आमचा मराठा समाजही (Maratha society) मराठ्यांची ताकद किती आहे, ते दाखून देणार आहे. यावेळी मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष करावयाचा आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही, तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, असे प्रतिपादन मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महासंवाद मेळावा प्रसंगी पारनेर येथे ते बोलत होते. 

नक्की वाचा: विखेंना विरोध करणाऱ्या भुतारेंची मनसेतून हकालपट्टी

जरांगे पाटील म्हणाले 

मराठा समाजाची आरक्षणसाठी ही शेवटची लढाई आहे. आमच्या लेकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. सरकारने आम्हाला कायद्याने खेटायचे ठरवले आहे. आम्ही मराठा बांधवही आपणास कायद्यानेच खेटणार आहोत.पारनेर शहरात जरांगे पाटील यांचे आगमन होताच जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला.

हे देखील वाचा: पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट

महापुरुषांना अभिवादन (Manoj Jarange Patil)

प्रथमतः जरांगे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. हनुमान मंदिर लगत असलेल्या दर्ग्याला चादर चढवण्यात आली. तर वेशी जवळ असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here