Manoj Jarange Patil : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील

0

Manoj Jarange Patil : राहुरी : ज्या मराठा समाजाने (Maratha society) तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात ही सरकारची भूमिका अत्यंत चुकीची आहे. माझ्यावर लावलेली एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही. मराठा समाजासाठी मी जेलमध्ये जाईल. परंतु माझ्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे (Crime) दाखल करून मराठा आंदोलकांना अंगावर घेऊ नका, अन्यथा तुमचा सुपडा साफ होण्यास वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.

हे देखील वाचा : शेतकरी संघटनेची गांधीगिरी; कारखान्याचा संचालकाचा केला सत्कार

मागे हटणार नाही (Manoj Jarange Patil)


वांबोरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जरांगे पाटील म्हणाले, सरकार आणि विरोधक एकत्र झाले तरी आता मागे हटणार नाही. मराठ्यांना जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

नक्की वाचा : ‘त्यांनी’ हिंदुत्त्वाचे विचार बाजूला ठेवून दिले; श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

मराठ्यांना झुलवत ठेवण्याचा राज्य शासनाचा डाव (Manoj Jarange Patil)

स्वतःच्या राजकारणासाठी सर्वजण एकत्र होऊ शकतात तर मग मराठ्याचा आरक्षणासाठी का होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित करत पुढील रणनीती आखण्यासाठी रविवारी (ता.२४) अंतरवालीत लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मनोज जारंगे पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, दहा टक्के न टिकणारे आरक्षण देऊन मराठ्यांना झुलवत ठेवण्याचा राज्य शासनाचा डाव मी ओळखला आहे. सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत व मी स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाच्या शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या कुणबी नोंदी सापडत असून हक्काचे आरक्षणासाठी मराठ्यांनी एकत्र येऊन अधिक तीव्र लढा देण्याची गरज असल्याचे यावेळी जरांगे म्हणाले. याप्रसंगी वांबोरी परिसरासह तालुक्यातून व जिल्ह्यातून सकल मराठा समाजाचे हजारो बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here