Manoj Jarange Patil : नगर : मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची बीड जिल्ह्यातील नारायण गडावर ८ जूनला तब्बल ९०० एकर परिसरात सभा होणार आहे. त्यासाठी सभेची जोरदार तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची जगातील सर्वात मोठी सभा (The biggest meeting) असणार आहे. संपूर्ण जगातून मराठा बांधव (Maratha society) या सभेला उपस्थित राहणार आहेत.
नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश
सभेची गिनीज बुकमध्ये होणार नोंद
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. सभेला देशभरातील सर्वच मराठे उपस्थित राहणार आहे. सभेची गिनीज बुकमध्ये नोंद होणार असून आंतरराष्ट्रीय मीडियाही या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेतले जाणार आहे. सभेला दीड लाख स्वंयसेवक मदत करणार आहे.
हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
सहा करोड मराठे येणार (Manoj Jarange Patil)
सभेला सहा करोड मराठे येणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. सभेला येणाऱ्या लोकांच्या जेवणाची आणि राहण्याची पार्किंगची व्यवस्था चोख करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच मराठा बांधवांनी या सभेला यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे