Manoj Jarange Patil : नगर : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) आचारसंहिता संपून ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच दिवशी म्हणजे, ४ जूनला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केले आहे.
हे देखील वाचा : मुंबईत तुफान वादळ
१० टक्के आरक्षणाचा फायदा नाही
आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कोणताही फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त
जरांगे पाटील म्हणाले की (Manoj Jarange Patil)
“माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही. यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचंही नुकसान झाले आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
गावोगावचे मराठा शांततेत आंदोलन करणार
तसेच गावोगावी असलेला मराठा समाज हा शांततेत आंदोलन करतील आसा मला विश्वास असून, मला समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नसल्याचेही ते म्हणाले. कारण मराठा समाजाला आता सगळं माहिती आहे.