Manoj Jarange Patil : कुणबी नाेंदी रद्द केल्यास सगळं सरकार डुबवून टाकणार; मनाेज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : कुणबी नाेंदी रद्द केल्यास सगळं सरकार डुबवून टाकणार; मनाेज जरांगेंचा सरकारला इशारा

0

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यात ५४ लाख नाेंदी सापडल्या. त्या नाेंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी (OBC) आंदाेलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. त्यावर जाे काेणी कुणबी नाेंदी रद्द करेल, त्याला आम्ही कसा डुबवताे तुम्ही पाहा. तुम्ही फक्त सगेसाेयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करू नका, मग तुम्हाला चांगलाच हिसका दाखवताे, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. 

नक्की वाचा: आम्हांला जनतेचा कौल मान्य : सुजय विखे पाटील

तरच मी उपोषण मागे घेतो : लक्ष्मण हाके

राज्य सरकारने ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करून त्याची लेखी द्यावी. तरच मी उपोषण मागे घेतो, अशी मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली. त्यावर मनाेज जरांगे म्हणाले,  “नाेंदी रद्द केल्यास सगळं सरकार डुबवून टाकणार, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. राज्य सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभा केले आहे. या माध्यमातून त्यांना दंगली घडवायचे आहेत. परंतु, गाव गाड्यातील एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देणार नाही. 

Manoj Jarange Patil : कुणबी नाेंदी रद्द केल्यास सगळं सरकार डुबवून टाकणार; मनाेज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : कुणबी नाेंदी रद्द केल्यास सगळं सरकार डुबवून टाकणार; मनाेज जरांगेंचा सरकारला इशारा

अवश्य वाचा : ‘त्या’ कुटुंबीयांना पराभवच मान्य नाही : खासदार लंके

बिहारमधील आरक्षणावर बोलताना जरांगे म्हणाले, (Manoj Jarange Patil)

“५० टक्केच्या वर आरक्षणाची मर्यादा गेली, की ते कोर्टात टिकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वांना आरक्षण मिळालं. मात्र, मराठ्यांचा आरक्षण हे दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. मग तुम्ही ते का देत नाही. सरकारने आरक्षण आमच्या हक्काचं असून तुम्हाला ते द्यावेच लागणार”, असंही मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here