Manoj Jarange Patil : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

Manoj Jarange Patil : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

0

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची महाशांतता रॅली १२ ऑगस्ट रोजी नगरमध्ये होणार आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर (Maratha Kranti Morcha) पुन्हा एकदा नगरमध्ये मराठ्यांचे वादळ धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी साेलापुरातून सुरू केलेल्या शांतता रॅलीचा समारोप १३ ऑगस्ट राेजी नाशिकला हाेणार आहे, अशी माहिती सकल मराठा (Maratha) समाजाकडून देण्यात आली.

नक्की वाचा: तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री हे दुर्देव; शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी

शांतता रॅलीद्वारे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणार आहे. मनोज जरांगे हे ७ ते १३ ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथे ते पोहोचणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार असल्याचे धनाजी साखळकर यांनी सांगितले. सांगावा आलाय पाटलांचा, पुढील मोहिमेचा… अशा पद्धतीने सोशल मीडियावर हा मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागला असून जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

असा असेल मनाेज जरांगेंचा दौरा (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील हे ७ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून मुक्काम सोलापुरात असणार आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी सांगली, ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, १० ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा, ११ ऑगस्ट रोजी पुणे, १२ ऑगस्ट रोजी नगर आणि १३ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here