Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?

Manoj Jarange Patil

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केलं आहे. मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना आता सुट्टी देणार नाही, मराठ्यांनी लाेकसभेला एकजूट दाखवली. त्यावेळी फक्त पाडा, म्हणलाे, तर मराठ्यांनी किमया केली. आता जर मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिले नाही, तर या विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार आहे, असा इशारा मनोज जरंगे यांनी दिला आहे.

अवश्य वाचा: मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

हे सरकार आरक्षण देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही (Manoj Jarange Patil)

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी शांतता रॅली आज शहरात होती. चाेपाटी कारंजा चौकात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, ”राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या पोरां-बाळांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असं ठरवले आहे. कारण, त्यांची पत्रकं चिटकवायला, प्रचार करायला मराठ्यांची पोरं पाहिजेत. हे सरकार आरक्षण देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. ते फक्त लावालाव्या करताना दिसत आहे. माझ्याविरुद्ध अनेक जणांना उठवून बसवले आहे. मराठ्यांचे समन्वयक फोडायला सुरुवात झाली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. राज्यातील विभागाविभागात वाद लावून राजकीय पाेळी भाजून घेण्याचा उद्याेग सुरू आहे. मराठ्यांपुढे काेणाची सत्ता नाही. मराठ्यांना एकत्र येऊ न देण्याचं या राजकीय नेत्यांचं षडयंत्र आहे. राजकीय नेत्यांना त्यांना त्यांचा पक्ष माेठा करायचा आहे. मात्र, मला माझी जात आणि समाज माेठा करायचा आहे. आजवर मराठा समाजानं राजकीय नेत्यांना डाेक्यावर घेतलं आणि हेच राजकीय नेते मराठा आरक्षण देण्यास विराेध करत आहे. ज्यांना माेठं केलं तेच उलटले. आपलं वाटाेळे करायला सर्व पक्षाचे नेते जबाबदार आहे. मराठा समाजाने एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका. आपण एकजूट राहिलाे, नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही. या स्वार्थी नेत्यांच्या अजिबात प्रचाराला जायचं नाही. आपण त्याचे नाेकर नाही. मी यांना मॅनेज हाेत नाही. हे त्यांच सर्वात माेठं दुखणं आहे. मराठा समाज माझी संपत्ती आहे. आज माझ्या मागे एसआयटी लावली. 

नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार

सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवून देईन (Manoj Jarange Patil)

देवेंद्र पडणवीस यांनी छगन भुजबळ या टाेळी मुकादम, तर प्रवीण दरेकर यांच्या मार्फत अभियान राबवून मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. मराठ्यांनाे यापुढच्या काळात एकजुटीने राहा. येत्या २९ तारखेला लढायचे की पाडायचे, हे ठरणार आहे. मराठ्यांना शंभर टक्के मतदान करायचे, एकही मत वाया जाऊ द्यायचं नाही. विधानसभेला जातीसाठी मतदान करायचं आहे. मतदान झाल्याशिवाय काेणीही तीर्थयात्रेला जायचे नाही. या विधानसभेला ११३ आमदारांना पाडायचं आहे. छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा. पाडायच्या भूमिका आपली निर्णायक ठरणार आहे. नेत्याला बाप म्हणायचं बंद करा. मराठ्यांनी आता सावध व्हा. मी मरायला नाही भीत. माझा समाज माेठा झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. या सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्हाला आरक्षण मिळवून देईन, एकही इंच मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here