Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आलं आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.
नक्की वाचा : “मी काही साधू संत नाही”; बीडमधून अजित पवार यांचा इशारा
राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना आश्वासन
मनोज जरंगे पाटील यांचे पाच दिवसांपासून उपोषण सुरु होतं. राज्य सरकारच्यावतीने त्यांच्या उपोषणाची दखल घेत भाजप आमदार सुरेश धस हे अंतरवली सराटीत जरांगेंच्या भेटीसाठी आले. त्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे अतोनात प्रयत्न केले. यावेळी जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे सुरेश धस यांनी सुर्वण मध्य साधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासनं देण्यात आली. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता उपोषण नाही तर थेट समोरासमोर लढाई होणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अवश्य वाचा : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश
मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं (Manoj Jarange Patil)
उपोषण स्थगितीपूर्वी जरांगे यांनी केलेल्या भाषणात सांगितले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला पाहिजेच आहे. ते नाही झाले, तर लवकरच मुंबईची तारीख जाहीर करतो. मग वापस येणार नाही, आम्हाला मुंबईला पोलिसांनी मारले तर पोलिसांना बोट लावायच नाही. पण, मंत्र्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायच आहे. अंमलबजावणी न झाल्यास लवकर मुंबईची तारीख जाहीर करेल, तेव्हा मुंबई जाम होऊ शकते, असेही जरांगे पाटील म्हणाले.