Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील बुधवारी अहिल्यानगरमधून जाणार

Manoj Jarange Patil

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

कोड रेड

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत (Mumbai) शुक्रवारपासून (ता. २९) उपोषण करणार आहेत. त्यासाठी ते छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) वरून कल्याण मार्गे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. बुधवारी (ता. २७) ते अहिल्यानगर जिल्ह्यातून घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बाह्यवळण रस्ता मार्गे नेप्ती चौक, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर मार्गे कल्याणला जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

वाहतुकीत बदल (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील बुधवारी अहिल्यानगरमधून जाणार
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील बुधवारी अहिल्यानगरमधून जाणार
  • नेवासाफाट्याकडून अहिल्यानगर बाह्यवळणकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल – नेवासा फाटा – श्रीरामपूर – राहुरी फॅक्टरी – विळद बाह्यवळण मार्गे इच्छित स्थळी
  • अहिल्यानगर एमआयडीसी – शेंडी बाह्यवळण – पांढरीपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल – विळद बाह्यवळण – राहुरी फॅक्टरी – श्रीरामपूर – नेवासा फाटा मार्गे इच्छित स्थळी
  • शेवगावकडून मिरी-माका मार्गे पांढरीपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल – शेवगाव – कुकाणा – नेवासा फाटा मार्गे इच्छित स्थळी किंवा शेवगाव – तिसगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • पांढरीपूलकडून मिरी – माका मार्गे शेवगावकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल – जेऊर – कोल्हार घाट – चिचोंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.