Manoj Jarange Patil : नगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या आंदोलनाला राज्य सरकारने (State Government) आणखी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. सध्या जरांगे उपोषणस्थळी बसलेले आहेत. तर दुसरीकडे आझाद मैदानाचा परिसर, सीएसएमटी () अशा महत्त्वाच्या भागात आंदोलक थांबलेले आहेत. काहीही झालं तरी मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच हा इशारा देताना त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या आगामी दिशेबद्दलही सांगितलं आहे. हे आंदोलन पुढे गेले तसेच मागण्या मान्य करण्यास विलंब लावला तर सरकारच्या अडचणी वाढतील, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केल्याचा आरोप
मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या, तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे, मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे असंही ते म्हणाले. मराठ्याची मुलं माज आणि मस्ती घेऊन आले नाहीत तर मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आले आहेत, त्याची सरकारने जाण ठेवावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, (Manoj Jarange Patil)
“गोरगरीबांचे मन जिंकण्याची उत्तम संधी सरकारकडे आहे. मराठे सरकारला कधीही विसरणार नाहीत. आम्हाला आरक्षण मिळाले तर आम्ही सरकारचे आभार मानू. एक एक दिवस उपोषणाला मुदतवाढ देण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य कराव्यात.”
मी तर संपणार, नाहीतर आरक्षण तरी घेणार
ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरणार, पण मागे हटणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता फक्त आरक्षण घेणार नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.