Manoj Jarange Patil:मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी (Death Threat) मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीनं कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमोल खुणे, दादा गरुड आणि कांचन साळवीला १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी (Court Custody) सुनावण्यात आली आहे.

नक्की वाचा: ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात 

कोर्टात काय घडलं ? (Manoj Jarange Patil)

आज जालन्यातील अंबड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींना हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दादा गरड आणि अमोल खुणे यांना अटक केली होती. त्यानंतर ११ नोव्हेबंरला रात्री उशीरा कांचन साळवी याला पोलिसांनी अटक केली होती. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन सळवीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

अवश्य वाचा: बॉलिवूडचा जुना चेहरा हरपला! अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन 

नेमकं काय घडलं ? (Manoj Jarange Patil)

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली होती. तब्बल अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. धक्कादायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातो आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली. त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले होते.