Manoj Jarange Patil:’आम्हाला विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकद लावा,मनोज जरांगेंचा प्रकाश शेंडगेंना सल्ला

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांना मोठा सल्ला दिला आहे. आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवा. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, असं ते यावेळी म्हणालेत.

0
Manoj Jarange Patil:'आम्हाला विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकद लावा,मनोज जरांगेंचा प्रकाश शेंडगेंना सल्ला
Manoj Jarange Patil:'आम्हाला विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकद लावा,मनोज जरांगेंचा प्रकाश शेंडगेंना सल्ला

नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांना मोठा सल्ला दिला आहे. आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवा. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, असं ते यावेळी म्हणालेत. अंतरवाली सराटी (Antaravali Sarati) येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

नक्की वाचा : सांदण दरी परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री,वन विभागाचा मोठा निर्णय  

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शंभूराज देसाई आले त्यांनी शब्द दिला. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. सरकारवर विश्वास ठेवावा लागेल. मागेपुढे सरकणे सुरू राहते. एक महिना त्यांना हवा होता तो दिला आहे. आता १३ जुलैपर्यंत काहीच बोलायचं नाही.

अवश्य वाचा :  पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू   

‘गोरगरिबांसाठी काम करा’ (Manoj Jarange Patil)

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारने सगे सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा रस्त्यावर उतरु,  ५७ लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे.  यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना मी काय बोलू. राहू महाराष्ट्रात सगळे उभे. तुम्ही तिकडून आम्ही इकडून आणि ही ताकद त्यांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी दाखवली पाहिजे. विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकद लावा, गोरगरिबांसाठी काम करा. एसटीमधून धनगर बांधवांना आरक्षण देण्यासाठी लढा. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

विरोधक मानले असते तर तोडीस तोड उत्तर दिले असते(Manoj Jarange Patil)

ओबीसी आंदोलनवर मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना उत्तर मी देणार नाही. माझा समाजाला मी आरक्षण मिळवून देण्यात खंबीर आहे. हे आयोग आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो की नाही ते सरकारला विचारावे. विरोधक मानले असते तर तोडीस तोड उत्तर दिले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here