Manoj Jarange Patil:’आंदोलन मोडायच्या मागे लागू नका’;मनोज जरांगे कडाडले 

राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा (Maratha Strike) मुद्दा पेट घेण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला (Strike) परवानगी नाकारली आहे. परवानागी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत.

0
Manoj Jarange Patil:'आंदोलन मोडायच्या मागे लागू नका';मनोज जरांगे कडाडले 
Manoj Jarange Patil:'आंदोलन मोडायच्या मागे लागू नका';मनोज जरांगे कडाडले 

Manoj Jarange : राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा (Maratha Strike) मुद्दा पेट घेण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला (Strike) परवानगी नाकारली आहे. परवानागी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे म्हणालेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला.

नक्की वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

तुम्ही विनाकारण डाव रचू नका – मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)

जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम नाही करत तुम्ही, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या, दोघांनाही सांगतोय मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. आंदोलन मोडायच्या मागे लागू नका, या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी आहे. स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे, तुम्ही विनाकारण डाव रचू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता. मात्र जरांगे पाटील नव्या ठिकाणी उपोषणाला बसणार होते. जरांगे सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत आपण उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून;ट्रेलर लाँच   

मी कायदा मानतो, मी घटना मानतो आणि घटनेने मला अधिकार दिला आहे, परवानगीने अधिकार दिला नाही. चार तारखेला आचारसंहिता होती. मी आचारसंहितेचा सन्मान केला. पण आता मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो,कायद्याने मला अधिकार दिल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेल आहे. हे आंदोलन स्थगित आहे, स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here