Manoj Jarange Patil : कलंक लागलेला, दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे छगन भुजबळ; मनाेज जरांगे पाटलांचा घणाघात

0
Manaj Jarange Patil : कलंक लागलेला, दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे छगन भुजबळ; मनाेज जरांगे पाटलांचा घणाघात
Manaj Jarange Patil : कलंक लागलेला, दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे छगन भुजबळ; मनाेज जरांगे पाटलांचा घणाघात

Manoj Jarange Patil नगर : ”हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा (Maratha) बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला, कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आहे”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला.

हेही वाचा : राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं सूचक विधान

मनाेज जरांगे पाटलांची जालन्यात सभा झाली. सभेच्या सुरूवातीपासूनच जरांगेंनी भुजबळांवर चाैफेर टीका केली. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर हल्ला चढवला. त्याचवेळी भुजबळांच्या दबावात येऊन आरक्षण रोखाल, तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. तसंच दाेन दिवसांत अंतरवालीमधले आणि एका महिन्यात महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली. जालन्यातील सभेतून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. १७ डिसेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांची बैठक होणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय.

अवश्य वाचा : Anti Corruption Bureau : नगर जिल्हा परिषदेचा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

जरांगेंच्या सभेला लाखो मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. जरांगेंचं व्यासपीठावर आगमन होताच गर्दीतल्या लोकांनी मोबाईलचा टॉर्च पेटवून त्यांचं स्वागत केलं. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उडवली. मराठ्यांच्या नोंदी शासकीय आहेत, तरी ही मराठयांना आरक्षण न देण्याचा चंग भुजबळ यांनी बांधला आहे. मराठयांना आरक्षण भुजबळ यांनी मिळू दिलं नाही, सरकार यांच्या दबावाखाली आल्यानं मराठ्यांच्या नोंदी दाबल्या असा आरोप जरांगेंनी केला. छगन भुजबळ हे बुरसटलेल्या विचारांचा नकल्या आहेत, नकला करणं भुजबळांचा धंदाच आहे. ज्यांनी मोठे केलं त्यांनाच भुजबळांनी पायाखाली तुडवलं, अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केलीय. २४ डिसेंबरच्या आत आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा जड जाईल, असेही जरांगे म्हणाले. उद्यापासून सगळ्या गावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here