नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat) देत त्यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार स्वतः मनोज जरांगे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल (ता.५) मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे लेखी तक्रारीत नमूद केले आहे. पोलीसांनी या तक्रारीवरून बीडमधून दोघांना ताब्यात (Two arrested from Beed) घेतले आहे.
नक्की वाचा: पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले मी…
बीडमधून दोघे पोलिसांच्या ताब्यात (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. या संदर्भात तक्रार अर्ज दिल्यानंतर जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. या तपासात तथ्य आढळून आले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे बन्सल यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?
मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दोन वर्षापासून आंदोलन करत आहेत. अंतरवाली सराटीतून सुरू झालेले हे आंदोलन एकदा मुंबईच्या वेशीवर तर दुसऱ्यांदा थेट मुंबईत धडकले होते. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आणि हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे.
अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा दावा (Manoj Jarange Patil)
नुकताच बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला.या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ, मुंडे यांनी टार्गेट केले होते. यावरून वातावरण तापलेले असतानाच आता थेट जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दोघांना दिल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतून अमोल खुणे, दादा गरुड या दोघांना गुरुवारी (ता.६) सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.



