
नगर : ‘फडणवीस साहेब सांगा आई आणि लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा’.आम्हाला न्याय कधी मिळणार म्हणत संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh Murder Case)आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. संतोष देशमुख यांना अभिवादन करुन देशमुख कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मस्साजोगमध्ये गेले होते. यावेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईला आणि पत्नीला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
नक्की वाचा: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार (Manoj Jarange Patil)

फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार ? असा सवाल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईने उपस्थित करत हंबरडा फोडला. फडणवीस साहेब सांगा, आईने, भावाने लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा. सून घेऊन बसले, लेकरं इकडे तिकडे पाठवले आता मी करायचं काय? असा सवाल देखील संतोष देशमुख यांच्या आईने केला. सीआयडी आहे म्हणतेत मग तपास का होत नाही. तुम्हाला वेळ का लागतो? का आम्हालाच काहीतरी करायचे असे सरकारने ठरवलंय का ? आम्हाला सरकारने उत्तर द्यावं. लेकरं कुठेतरी ठेवलेत याचं सरकारने काहीतरी बघावं लागेल. धनु सोबत कोणीतरी पाहिजे आणि आम्हाला देखील पोलीस संरक्षण पाहिजे, अशी मागणी देखील संतोष देशमुख यांच्या आईने केली आहे.
अवश्य वाचा: व्ही.शांताराम चित्रपटात जयश्रीच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया;पोस्टर प्रदर्शित
९ डिसेंबर काळा दिवस साजरा होणार (Manoj Jarange Patil)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त आज मस्साजोग येथे काळा दिवस पाळण्यात आला आहे. इतकच नाही तर प्रत्येक वर्षी ९ डिसेंबर हा काळा दिवस म्हणून असेल. त्याचबरोबर सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.


