श्रीरामपूर : मराठा योद्धा म्हणून महाराष्ट्रभर नावाजलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या श्रीरामपूरमध्ये भव्य सभा (Grand meeting in Shrirampur)आयोजित करण्यात आली होती. या सभेप्रसंगी येथील सुप्रसिद्ध चित्रकार रवी भागवत यांनी जरांगे पाटील यांचे ५४ चौरस फुटांचे भव्य (Magnificent picture of 54 square feet) असे चित्र हजारो श्रोत्यांसमोर साकारले.
नक्की वाचा : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता
जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी अनेक दिवसांपासून श्रीरामपूर शहरात सुरू होती. या स्वागताचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाचे नितीन पटारे यांच्या पुढाकारातून चित्रकार भागवत यांनी ६ बाय ९ आकाराची कॅनव्हास फ्रेम तयार केली. कार्यक्रम स्थळी हे चित्र साकारण्याचे ठरले. त्याप्रमाणे सायंकाळी ७ वाजता हजारो श्रोत्यांच्यासमोर भागवत यांनी चित्र रेखाटण्यास प्रारंभ केला.
अवश्य वाचा : जिओ स्टुडिओजच्या ‘एक दोन तीन चार’ चा टिजर रिलीज
ॲक्रेलिक रंगाच्या सहाय्याने सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर मनोज जरांगे यांची सरकारला इशारा देणारी प्रतिमा भागवत यांनी कॅनव्हॉसवर चित्रित केली. सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते व कवी बाबासाहेब सौदागर यांनी भागवत यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. जरांगे पाटील यांच्यासोबत अंतरवली येथून आलेल्या टीमचे नेतृत्त्व करणारे प्रदीप सोळुंके हे चित्र पाहून स्तब्ध झाले. त्यांनी चित्राचे कौतुक करून भागवत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.
जरांगे पाटील सभास्थानी येताच त्यांनीही भागवत यांची भेट घेऊन चित्र पाहिले. श्रीरामपुरकरांच्या वतीने झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागताचा त्यांनी हात जोडून हसतमुखाने स्वीकार केला. यावेळी त्यांनी चित्राचे व भागवत यांचे कौतूक केले. या प्रसंगी पत्रकार बाळासाहेब आगे, नितीन पटारे, माजी नगरसेवक संजय गांगड, संदिप चोरगे, राहूल उंडे आदी उपस्थित होते.