नगर : ‘आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी उपोषण मागे घ्यावं,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत (Strike) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती. ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
अवश्य वाचा : प्रतीक्षा संपली!’मिर्झापूर सीझन ३’ची रिलीज डेट जाहीर
‘ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही’ (Devendra Fadnvis)
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले, केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यांची मागणी आहे. त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे, त्यांना सर्टिफिकेट देता येतं. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असे आमचे मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.