Manoj Jarange:लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुणीही माझा फोटो, नाव वापरू नयेत असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसेच, असे कुणी केल्यास त्याला मराठा समाजाने मदत करू नये, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.  

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारात कुणीही माझा फोटो, नाव वापरू नयेत असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसेच, असे कुणी केल्यास त्याला मराठा समाजाने (Maratha community) मदत करू नये, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.  

नक्की वाचा : राजस्थानचा सलग तिसरा विजय;मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले  

मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही-मनोज जरांगे (Manoj Jarange)

 लोकसभा निवडणुकीबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की, “माझा कोणालाही पाठिंबा नाही, मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही. कोणीही माझ्या फोटोचा वापरू नका आणि नावही वापरू नका, तुम्ही एकाने वापरला तर बाकीचे पक्ष सुद्धा वापरतील. तुमच्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा फायदा घेऊ नका. जो जाणून-बुजून नाव घेतो किंवा फोटो वापरतोय त्यांना मराठा समाजाने मदत करू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

अवश्य वाचा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हेंसह ४० दिग्गजांचा समावेश  

देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उगवायला लागलेत- मनोज जरांगे (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर देखील निशाणा साधला आहे. तसेच, अशोक चव्हाणांची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने देखील संताप व्यक्त केला आहे. “मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का? अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर घोषणा देण्याऱ्या तरुणावरती दाखल झालेल्या गुन्ह्यावर जरांगे यांनी सवाल उपस्थित केला आहे. हे मराठ्यांविरोधात केलेले षडयंत्र असून, देवेंद्र फडणवीस यांनी हे षडयंत्र रचले आहेत. तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवर केसेस दाखल करायला लागलेत. गाडीच्या खाली उतरून तुम्हाला मारहाण केली का ? इतका सुड देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उगवायला लागलेत,असे जरांगे म्हणाले. पण सगळा महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांसोबत असून, त्यांनी काळजी करायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांचा आता खेळ भरत आला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here