Manoj Jarange:’मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा,मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत’-मनोज जरांगे 

0
Manoj Jarange:'मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा,मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत'-मनोज जरांगे 
Manoj Jarange:'मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा,मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत'-मनोज जरांगे 

नगर : ‘मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे.मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत’,असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण (Strike) करत आहेत. त्यांच्या उपोषणस्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले. मात्र वडीगोद्री या गावात त्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी हा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : अखेर आमदार अपात्रता प्रकरणाला मुहूर्त;’या’दिवशी होणार सुनावणी

‘मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत’ (Manoj Jarange)

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, त्यांनी रस्ता बंद केलाय तर काही फरक पडत नाही. ते रस्ते भुजबळ आणि फडणवीस यांनी बंद केले आहेत. त्यांचं तोंड बघू नये. तुम्ही आमच्या तरुणांना मारले आहे, शेवट मी आंदोलन संपल्यावर करेल. मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे. त्यांनी रस्ता बंद केला तो महामार्ग आहे.  हेच मराठा समाजाने केले असते तर मराठे जातीयवादी म्हटले असते. मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत,असा गंभीर इशारा जरांगेंनी दिला आहे.

अवश्य वाचा : पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका!नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी
जरांगे पुढे म्हणाले की, छगन भुजबळला दंगल घडवायची आहे. त्यांना पोलिसांच्या काठ्या खायच्या आहेत. त्यांनी सुरुवात केलीय, शेवट मी करणार आहे.ओबीसी मराठा वाद नाही, गावखेड्यात एक आहे. तिथल्या पोलीस निरीक्षकाला पण मस्ती आलीय, जातीवाद करत आहे, आपल्या मुलांना त्रास देत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.  

‘मराठवाड्यामध्ये तीन ठिकाणी बंद’ (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज मराठवाड्यामध्ये तीन ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पाळला जात आहे. काल परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.आज देखील विविध मराठा संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. या ठिकाणी बंदचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. तिकडे नांदेड शहर आणि नायगावमध्ये देखील बंदची हाक देण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यात देखील मराठा संघटनांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली असून दुसरीकडे ओबीसीकडून धनगर आणि बंजारा समाजाच्या वतीने देखील ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here