नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) झटणारे मनोज जरांगे हे येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण (Hunger Strike) करणार आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता ते १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. ‘राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
नक्की वाचा : विदर्भात पावसाचे थैमान!हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मनोज जरांगेमुळे महायुती सरकारची कोंडी (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मोठ्या उमेदवारांचा समावेश होता.
अवश्य वाचा : खुशखबर!वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी जरांगे करणार उपोषण (Manoj Jarange Patil)
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात २८८ उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर ते घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात.असं घडल्यास भाजप आणि महायुती सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.