Manoj Jarange Strike:अखेर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित;शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे.

0
Manoj Jarange Strike:अखेर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित;शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला
Manoj Jarange Strike:अखेर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित;शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला

Manoj Jarange : नगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhujraje Desai) आणि संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी दिला देऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.

नक्की वाचा : नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा;विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द

मनोज जरांगेंचा सरकारला एक महिन्याचा अवधी (Manoj Jarange Strike)

मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करत सरकारला एक महिन्यांचा अवधी दिला आहे. तसेच, पुढील एक महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उभारणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. त्यानंतर, मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.

अवश्य वाचा : ‘मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं’- देवेंद्र फडणवीस

मनोज जरांगेंच्या ‘या’ मागण्या (Manoj Jarange Strike)

मनोज जरांगे यावेळी म्हणालेत, सगे सोयरे याची व्याख्या आहे, त्याप्रमाणेच हवी, समाजाला फटका बसायला नको. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा कायदा पारित करायला हरकत नाही. सरकारने हैद्राबाद गॅजेट लागू करावे, सातारा संस्थान मुंबई गॅजेट लागू करावे. राजे शब्दाला वेगळे आहेत म्हणून त्यांच्याशी बोलतो आहे, असे म्हणत शंभुराज देसाईंच्या विनंतीनंतर आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केली. मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात नेमण्यात आलेल्या शिंदे समितीला कायम नोंदी शोधण्यासाठी सांगण्यात आले आहे. आता आमच्या अडचणी सांगतो, नोंदी सापडल्या पण सर्टिफिकेट काही अधिकारी देत नाहीत. त्यानंतर, व्हेरिफिकेशन देत नाहीत. ईडब्लूएसमधून ईसीबीसीमध्ये येता येतं, पण ओबीसीत येता येत नाही. त्यामुळे, त्यांना मार्ग खुला करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

आम्ही पाच महिने वेळ दिला त्यात दोन महिने आचारसंहितेमध्ये गेले आहेत. वाशीपासून आजपर्यंत ५ महिने दिले, पण सरकारने काही केलं नाही. आम्ही तुम्हाला ३० जूनपर्यंत मुदत देतो, पण त्यांनी १ महिना मागितला आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचे, असा प्रश्न जरांगे यांनी समोरील लोकांना विचारला. त्यानंतर, सरकारला १३ जुलैपर्यंत १ महिन्याची मुदत देण्यात आली. तसेच १ महिन्याच्या आत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर निवडणूक लढवणारअसल्याचे सांगण्यात आले. १ महिना देण्यास आम्ही तयार, त्यानंतर काही म्हणू नका. वेळ आली तर विधानसभेला जागेवर सीट उभा नाही करणार, तर नावं घेऊन उमेदवार पाडणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारमधील नेत्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here