Manoj Jarange:’एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही’-मनोज जरांगे 

0
Manoj Jarange:'एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही'-मनोज जरांगे 
Manoj Jarange:'एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही'-मनोज जरांगे 

नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आग्रही असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही,असं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना एका जातीवर (Caste) निवडणूक न लढवता सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे ऐन विधानसभेत मनोज जरांगे हे कोणते राजकीय गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

नक्की वाचा : मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस

मनोज जरांगे काय म्हणाले ? (Manoj Jarange)

काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता एकच उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही,असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. प्रत्येकालाच उभं राहायचं आहे. त्यामुळे मी सर्वांना बोलून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर मी नाराज होणार नाही. सर्वांनी ३०-४० दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील,असं जरांगे म्हणालेत. दरम्यान आज उमेदवार जाहीर करणार नसल्याचे ते म्हणालेत. सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे की, एकच जण उभा रहा.किती मतदारसंघ काढायचे हे आज जाहीर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी;अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?

उमेदवार कधी जाहीर करणार ? (Manoj Jarange)

जरांगे पुढे म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. २९ किंवा ३० तारखेला मतदार संघ जाहीर करू, तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही,असं मनोज जरांगे म्हणालेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल असं त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here