Manoj Jarange:’धनंजय मुंडेंप्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे एक टोळी,ती फार वळवळ करते’-मनोज जरांगे

0
Manoj Jarange:'धनंजय मुंडेंप्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे एक टोळी,ती फार वळवळ करते'-मनोज जरांगे
Manoj Jarange:'धनंजय मुंडेंप्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे एक टोळी,ती फार वळवळ करते'-मनोज जरांगे

नगर : मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnvis) तुमच्याकडे एक टोळी आहे.ही टोळी जरा बंद करा,ती फार वळवळ करते. एखाद्या कुत्र्याला खायला घातल्यासारखं त्यांना खाऊ घातलं असल्याचे दिसतंय. तशीच एक टोळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे पण आहे. बीड प्रकरणावर बोललं की, हे आपला विरोध करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जे लोक बोलतात तेही याचं टोळीचे आहेत. मात्र एकदा आंदोलनातून मोकळे होऊ द्या, यांना उत्तर देऊ,असा इशाराही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

नक्की वाचा : एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणे हा पवारांचाच अपमान’-संजय राऊत

‘शिवजयंतीपर्यंत अरबी समुद्रात स्मारक व्हायला पाहिजे होत’ (Manoj Jarange)

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे उद्घाटन केलं होतं. मात्र अजून त्याचा पाया देखील रचला गेला नाही. देशात आणि राज्यात तुम्हाला हिंदूंची मतं, मराठ्यांकडून सत्ता चालते, मात्र या देशाचे आणि राज्याचे दैवत छत्रपती शिवरायांचे स्मारक उभं करायला वेळ लागतो, त्यासाठी तुमचा निषेधच केला पाहिजे. या शिवजयंतीपर्यंत अरबी समुद्रात स्मारक व्हायला पाहिजे होत. मात्र तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला साहेब म्हणतो. पण तुम्ही छत्रपतींचे स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मुंबईतील शिवाजी पार्कचे नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करा,अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

अवश्य वाचा : ‘व्हॅलेंटाईनला डे’ निमित्त ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

‘मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणींना शोधायला लागले’ (Manoj Jarange)

तुम्ही जनतेच्या भावनेशी जाणून बुजून खेळत आहात.मतदान घेईपर्यंत लाडक्या बहिणींना काहीही नव्हतं. मात्र मतदान झाल्यानंतर आता त्या लाडक्या बहिणींना शोधायला लागले आहेत. नियम आणि अटी घालू लागले आहे. जनता आता सावध झाली असल्याची टीका ही जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान,येत्या २२ फेब्रुवारी ते २२ मार्चमध्ये राज्यातील प्रत्येक गावातल्या माणसाने आंतरवलीत किंवा छत्रपती भवनमध्ये या गोर गरीब नागरिकांच्या अडचणी काय? कोणतेही काम असेल ते सांगा. ज्या अडचणी असतील त्या सांगा.आता साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते हे माहिती होणं गरजेचं आहे. जिल्ह्यात,तालुक्यात कोण आहे ही टीम माहित होणं गरजेचं आहे. अडीअडचणीसाठी,समस्या सोडविण्यासाठी सोबत या,असे आवाहन ही मनोज जरांगे यांनी यावेळी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here