Manoj Jarange :आता फक्त पाडा म्हणालोय;विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल – मनोज जरांगे

यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावेच लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

0
manoj jarange
manoj jarange

नगर : राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधान सभेला मैदानात उतरेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावेच लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आता माझी तब्बेत बरी आहे, काळजी करायची गरज नाही, असेही जरांगे म्हणालेत.

नक्की वाचा : मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल

मतामधून आपली ताकद दाखवा – मनोज जरांगे (Manoj Jarange)

मनोज जरांगे म्हणाले, पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही. सर्वांनी विनंती आहे, भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्याला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील. मतामधून आपली ताकद दाखवा, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी;सरकारकडून नवा आदेश जारी

बीडमधील नारायण गडची सभा रद् (Manoj Jarange)

यावेळी मनोज जरांगेंनी बीडमधील नारायण गडची सभा रद्द झाल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असे मनोज जरांगे म्हणालेत.

राजकारणात मराठ्यांची भीती – मनोज जरांगे (Manoj Jarange)

राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे आहे. आता त्यांना भीती वाटतं आहे. पाचव्या टप्प्यात सुद्धा भीती ठेवा.प्रत्येक मतदार संघात मोदी सभा घेत आहे.चार तारखेला पुन्हा उपोषण करणार काही झाले तरी करणार आहे. तिथे पुढची दिशा कळेल. पुढचे उपोषण आमरण उपोषण असणार आहे. सविस्तर प्लॅन चार  तारखेला करूयात. आम्हाला राजकारणात यायचे नाही पण आरक्षण दिले नाही तर आम्ही सर्व मराठा समाज विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरू,असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here