Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे.

0
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

नगर : मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. जरांगे यांचा बिपी खालवत चालला असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय

‘गोड बोलून काटा काढायचं काम सुरू’ (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील, गोड बोलून काटा काढायचं काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचं आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे. हा डाव सुद्धा असू शकतो, त्यांना मराठ्यांची माया असती तर चार चार दिवस उगच त्यांनी दिले नसते. मी कोणतेही उपचार घेणार नाही, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.

अवश्य वाचा : पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

‘थोडं थांबा कळेल तुम्हाला’- मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)

मंत्री छगन भुजबळ यांनी काल (ता.१०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात म्हटले की, मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे आहे. विनाकारण वाद वाढवू नये. मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसे समजू पण नका. यावर मनोज जरांगे म्हणाले की, तू नको सांगू मला, माझं मला कळतं. थोडं थांबा कळेल तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला आहे. माझा बीपी कमी झाला आहे, त्यामुळे उपचाराची गरज आहे, असं डॉक्टरांनी सांगितले. मात्र मी कुठलेही उपचार घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here