Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार 

एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

0
Maratha Reservation
Maratha Reservation

नगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावले आहे. त्यांना १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय : सुजय विखे पाटील

मनोज जरांगे काय म्हणाले ? (Maratha Reservation)

एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण नको. कारण ते टिकेल की नाही याची शाश्वती नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्हाला सगेसोयऱ्याचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा उद्या निश्चित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर उद्या पुन्हा मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाचा इशारा देणार आहेत.

महाराष्ट्रात मराठा समाज किती ? (Maratha Reservation)

मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे माजी न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला मागासवर्गीय आयोगाच्या निदर्शनास आले आहे. सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती आयोगाने अहवालात दिल्याचं सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीरापुरात मिरवणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here