Manoj Kotkar : नगर : केडगाव उपनगरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे तीव्र चटके बसत असताना महापालिका प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अपयशी ठरत आहे. येत्या आठ दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे (AMC) माजी सभापती मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर
नागरिकांना घ्यावे लागत आहे विकत टँकरने पाणी
यावेळी भाजपचे माजी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे, शुभम टाक, वैभव तापकीरे, संकेत काळे आदी उपस्थित होते. केडगाव उपनगरात आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. ते ही कमी दाबाने होत असून नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गातून महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद
पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन (Manoj Kotkar)
नागरिक वेळेवर पाणी पट्टी भरूनही त्यांना वेळेत पाणी मिळत नसल्याने मनपाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव चा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले.