Manoj Kotkar : नगर : केडगाव येथील महावितरण (Mahavitaran) विभागाच्या अधिकाऱ्याला जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी माजी नगरसेवक मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सहायक अभियंता राहुल सीताराम शिलावत यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
फिर्यादीत म्हटले आहे की,
केडगाव सबस्टेशन येथे बुधवारी (ता. १६) सायंकाळी फोन करून लोंढे मळा येथील बॉक्स मला न विचारता का बदलेले. त्यावेळी आम्ही एकच बॉक्स बदलला आहे, असे सांगितले. त्यानंतर मनोज कोतकर यांनी माझ्या कुटूंबियांना शिवीगाळ केली.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
वाहन अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप (Manoj Kotkar)
त्यानंतर मनोज कोतकर हा चारचाकी वाहनातून सबस्टेशन येथे आले. त्यावेळी माझ्या ऑफिसमधून बाहेर आलो असता चारचाकी वाहन माझ्या अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती हे करत आहेत.