Manoj Kotkar : केडगाव उपनगराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांचे जल अभियंत्याना निवेदन

Manoj Kotkar : केडगाव उपनगराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांचे जल अभियंत्याना निवेदन

0

Manoj Kotkar : नगर : केडगाव उपनगरातील पाणीपुरवठा (Water Supply) गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाला आहे. सुमारे १ लाख लोकसंख्या असलेल्या या भागात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यल्प दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

पाणी पुरवठा वेळेवर व पूर्ण दाबाने करण्याची मागणी

महिलांमध्ये विशेषतः असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणी पुरवठा वेळेवर व पूर्ण दाबाने सुरळीत करावी, अशी मागणी माजी सभापती मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांनी जल अभियंता परिमल निकम (Parimal Nikam) यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

महापालिकेच्या विरोधात संतापाची लाट (Manoj Kotkar)

नागरिकांना टँकरचा खर्च परवडत नाही, आणि घरांमध्ये पाणी नसल्यामुळे सतत तणावाचे वातावरण राहते. महिला वर्गामध्ये महापालिकेच्या विरोधात मोठी संतापाची लाट आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरी केडगाव उपनगराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना २ दिवसाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा. महापालिकेने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.