Manoj Kotkar : नगर : गेल्या अनेक दिवसांपासून केडगाव उपनगराला कमी दाबाने पाणी पुरवठा (Water Supply) होत आहे. महापालिका प्रशासनाच्या (Ahilyanagar Municipal Corporation) उदासीनतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता.१२) महापालिकेत हंडा मोर्चा व माठ फोडो आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांनी दिला आहे.
नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
मनोज कोतकर म्हणाले की, (Manoj Kotkar)
केडगाव उपनगरमध्ये सुमारे १ लाखाच्या पुढे नागरिक राहत असून त्यांना महापालिकेने पूर्ण दाबाने व वेळेवर पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र, कुठल्याही उपाययोजना महापालिकेकडून होताना दिसत नाही. आंदोलन केल्याशिवाय प्रश्न सुटत नसेल तर ही शोकांतिका आहे. मुळा धरणातून अमृतपाणी योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असतानाही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे का? जावे लागते.
अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मटका फोडो आंदोलन (Manoj Kotkar)
मी सभापती असताना या पाणी योजनेवर काम केले आहे. आता हिवाळ्याचे दिवस सुरू असताना नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, तर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होईल असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. येत्या शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचा हंडा मोर्चा व मटका फोडो आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला.



