Manoj Kotkar : नगर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा (Water supply) प्रश्न आता मार्गी लागणार आहे. केडगावकरांना तब्बल पाच तास पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे केडगावकरांना (Kedgaon) आता बारा लाख लिटर पाणी वाढून मिळणार असल्याचे, माजी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आंदोलनाचा इशारा देताच तातडीने पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा
माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगावकरांच्या पाणी प्रश्न संदर्भात महापालिकेत हंडा मोर्चा व माठ फोडो आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने पाणी प्रश्न संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम, मनोज कोतकर व इतर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केडगावला पाणीपुरवठा कसा सुरळीत करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर तोडगा काढत केडगावला पाच तास पाणीपुरवठा तसेच जास्तीचे १२ लाख लिटर पाणी दिले जाणार असल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने मनोज कोतकर यांना देण्यात आले.
अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन
यावेळी मनोज कोतकर म्हणाले, (Manoj Kotkar)
केडगावला कमी दाबाने व पाच ते सहा दिवसाने पाणी पुरवठा होत आहे. या पूर्वी ७ ते ८० लाख लिटर पाणी केडगावला दिले जात असे. आम्ही महापालिकेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हंडा मोर्चा व माठ फोडो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेने बैठक घेऊन जास्तीचा पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उद्या (ता. १२) होणारा हंडा मोर्चा व माठ फोटो आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.



