Manorama Khedkar:मोठी बातमी!मनोरमा खेडकरला पुन्हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

0
Manorama Khedkar:मोठी बातमी!मनोरमा खेडकरला पुन्हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
Manorama Khedkar:मोठी बातमी!मनोरमा खेडकरला पुन्हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

नगर : राज्यात वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी (Pune Police) पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी! शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी (Manorama Khedkar)

पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त केले आहे. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृह होऊ शकते.

अवश्य वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय;सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

मनोरमा खेडकरवर ३०७ कलम दाखल(Manorama Khedkar)


मनोरमा खेडकर यांना लवकरात लवकर जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिलीप खेडकर यांनी २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही.  मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम ३०७ वाढवण्यात आले आहे. याआधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here