Maratha : राहुरीत मराठा एकीकरण समितीचे ठिय्या आंदोलन

Maratha : राहुरीत मराठा एकीकरण समितीचे ठिय्या आंदोलन

0
Maratha : राहुरीत मराठा एकीकरण समितीचे ठिय्या आंदोलन
Maratha : राहुरीत मराठा एकीकरण समितीचे ठिय्या आंदोलन

Maratha : राहुरी : २६ मार्च हा राहुरीच्या (Rahuri) इतिहासात काळा दिवस ठरला आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींची नावे तत्काळ जाहीर करावीत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांनी दिला.

नक्की वाचा : आरोग्य सेवेचे सशक्तीकरण ‘मिशन मोड’वर

राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

राहुरी शहरात २६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींची नावे जाहीर करा. तसेच देवळाली प्रवरा येथील १९ तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी मराठा (Maratha) एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर आज (ता.१०) दुपारच्या सुमारास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देवळाली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अवश्य वाचा : रामनवमी मिरवणूक; मंडळ पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द गुन्हा

नावे जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी (Maratha)

यावेळी देवेंद्र लांबे, प्रशांत मुसमाडे, नितीन पठारे, समीर पठाण, सचिन म्हसे, सुरेश बानकर, गोरख दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींची तात्काळ नावे जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली. दरम्यान आंदोलकांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी चर्चा करून प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेट दिला. १० दिवसात आरोपींची नावे जाहीर करावी, अन्यथा २० एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सुरेश बानकर, सचिन म्हसे, गोरख दळवी, विक्रम तांबे, शामराव निमसे, प्रकाश संसारे, सचिन ढूस, गोरख मुसमाडे, नितीन पटारे, संदीप आढाव, रवींद्र म्हसे, आशिष बिडकर, कांता तनपुरे, डॉ. किशोर म्हस्के, मधुकर घाडगे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.