Maratha : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी 

Maratha : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी 

0
Maratha : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी 
Maratha : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी 

Maratha : कर्जत: मुंबई (Mumbai) येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि इतर मराठा बांधवाचे सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासाठी कर्जत शहर आणि तालुक्यातील घरातून ‘एक घास माणुसकीचा, एक घास आपुलकीचा’ या कर्जत तालुका सकल मराठा (Maratha) समाजाच्या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रेमाची शिदोरी जमा करून योगदान दिले. महत्वाचे म्हणजे या उपक्रमास गावोगावी सर्वच धर्मियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन दिले.

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

सुविधेच्या अभावाने खाण्यापिण्यासाठी अडचणी

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणास बसले आहे. त्यांच्या साथीला महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून लाखो समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहे. मात्र, तेथील सुविधेच्या अभावाने आंदोलनकर्त्यांस खाण्यापिण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्यावतीने या आंदोलनकर्त्यांसाठी एक घर- एक शिदोरीची हाक देण्यात आली.

आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च

अनेक गावातून न्याहारीसाठी खाद्यपदार्थचे पाकीट रवाना (Maratha)

या उपक्रमात कमीतकमी ५ भाकरी-चपाती, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे आपल्या माणसासाठी जमा करण्याची मोहीम आखली आहे. या हाकेला कर्जत शहर आणि तालुक्यातील प्रत्येक घरातून सर्वच धर्मियांनी मोठ्या प्रमाणावर ही प्रेमाची शिदोरी आणि माणुसकीचा घास जमा करण्यास सुरुवात केली. यासह परिसरातील महिला, तरुण युवक, सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, गावोगावी सजग नागरिकांनी घरगुती जेवण बनविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक गावातून न्याहारीसाठी खाद्यपदार्थचे पाकीट रवाना करण्यात आले.