Maratha : कर्जत : मराठा आरक्षण (Maratha Reservation) संबंधी मनोज जरांगे (Manoj Jarnge Patil) यांच्या ज्या मागण्या होत्या त्या राज्य सरकारने मान्य केल्या. तसेच मागण्या मान्य केलेला जीआर जरांगे यांना सुपूर्द करताच त्यांनी तो मान्य केला आणि आपले उपोषण सोडल्याचे वृत्त सोशल मीडियावर धडकताच कर्जतच्या मराठा (Maratha) बांधवांनी चक्क मुंबई-पुणे मार्गावरच वाहनातून उतरत जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला.
नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!
मागण्यांचा तात्काळ जीआर काढला
तर कर्जतमध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने फटाके फोडण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. मंगळवारी दुपारी उपसमितीने जरांगे यांना राज्य सरकारने तयार केलेला मसुदा प्रत्यक्ष दाखवत सकारात्मक चर्चा घडवली. जरांगे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा-मसलत करीत सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा तात्काळ जीआर काढावा तरच आपले आंदोलन स्थगित करणार अशी खमकी भूमिका मांडली.
अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी
मराठा समाजाच्यावतीने फटाके फोडत आनंदोत्सव साजरा (Maratha)
यावेळी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी तात्काळ सूत्रे हलवत जरांगे यांना जीआरच्या प्रती सुपूर्द करताच त्यांनी ते मान्य केले. आणि आपले पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण सोडले असे वृत्त कर्जत शहर आणि तालुक्यात समजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एक मराठा-लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ-जय शिवराय, आता कसं पाटील म्हणतील तसं, लडेंगे-जितेंगे हम सब जरांगे या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.