Maratha Kunbi Certificate:मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? 

0
Maratha Kunbi Certificate:मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? 
Maratha Kunbi Certificate:मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? 

नगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) केलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला एक जीआर शासनानं काढल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. आता या आदेशानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांनी अर्ज करायचा ? या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली आहे.

नक्की वाचा : आचार्य देवव्रत आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; गुजरातसह आता महाराष्ट्राचाही अतिरिक्त कार्यभार   

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? (Maratha Kunbi Certificate)

नगर : छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज थेट उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करावा. त्यानंतर अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवली जाईल. या समितीकडून वंशावळ तपासणी केली जाईल. त्याचबरोबर जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट;भाच्याने केले ‘हे’ गंभीर आरोप  

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Maratha Kunbi Certificate)

1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

2) वरील कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.

4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.