Maratha Protest : मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

0
Maratha Protest 
Maratha Protest 

नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस (ST Bus) पेटवून देण्यात आल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद (Internet Service Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.

नक्की वाचा : घोड तसेच कुकडी प्रकल्पातून १ मार्चला आवर्तन

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते. यावेळी ते आक्रमक झाल्याने मराठा समाज सुद्धा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाऊलं उचलले जात आहे.

अवश्य वाचा : ‘द क्रू’ मध्ये करीना, क्रिती व तब्बू झळकणार; पोस्टर रिलीज

संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद (Maratha Protest)

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान सतर्क झालं आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी (Maratha Protest)

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या आंतरवाली सराटी गावात असून, त्यांनी सर्व आंदोलकांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here