Maratha Reservation : हंगा येथे सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी गाव बंद व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण.

हंगा येथे सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी गाव बंद व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

0
205

पारनेर : हंगा ता पारनेर येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) तसेच मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या मार्गदर्शनानुसार हंगा – मुंगशी गाव च्या वतीने गाव बंद अंदोलन व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले तसेच काही वेळ पारनेर सुपा रस्ता वर आंदोलकांनी रस्ता रोको केला.

हे देखील वाचा: नेवासा येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी बंदला १०० टक्के प्रतिसाद

 हाडको बस स्टॉप वर सरपंच राजू शिंदे माजी सरपंच बाळासाहेव दळवी नंदू नाथा शिंदे  धोंडीभाऊ नगरे  चंद्रकांत मोढवे जगदीश साठे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष  सचिन साठे राजू सोंडकर बी डी साठे संतोष ढवळे सतिष दळवी मच्छिंद्रनाथ दळवी नंदू सोंडकर उदय दळवी नितीन साठे सागर दळवी  यांच्या नेतृत्वाखाली  तरुणांनी मोर्चा काढला त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता . हंगा गावात आरक्षणास सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठींबा दिल्यामुळे जातीय सलोख्याचे दर्शन घडले .

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी माजी सैनिकाच्या पत्नीचा आत्महत्येचा इशारा

मोर्चा ने सर्व जण एकत्र येत त्यांनी हंगा पारनेर रोडवर रास्ता रोको केला यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मधे शाळकरी मुलांनी देखिल सहभाग घेतला या वेळी संतप्त तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवले परंतू आमदार निलेश लंके यांनी  मुंबईवरून फोनद्वारे संपर्क करून शांततामय मार्गाने आंदोलन करण्याबाबत सूचना दिल्या त्यानंतर सर्वानी गावात फेरी काढण्यात आली उपोषण स्थळी ज्ञानदेव लंके गुरुजी सरपंच राजेंद्र शिंदे चंद्रकांत मोढवे पोपटराव इथापे  आबासाहेब दळवी  सुदाम दळवी मच्छिंद्र दळवी अशोक दळवी सर रमेश दळवी यांची भाषणे झाली . मराठा अंदोलनाला पाठींबा तसेच मनोज जरांगेच्या उपोषणाला बळ देण्यासाठी माजी सरपंच बाळासाहेब दळवी जगदीप साठे पप्पू ढवळे राजू रोकडे चेअरमन बापू दळवी जालिंदर थोरात दादा सोंडकर सुदाम थोरात निलेश जालिंदर दळवी राजू दळवी  रमेश दळवी सागर दळवी तुषार दळवी यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी हंगा गाव व पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थिती लावली आहे.