Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश

0
Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीत मराठा आंदोलकांना उद्या संध्याकाळपर्यंत आझाद मैदान वगळता मुंबईतील (Mumbai) सर्व रस्ते खाली करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. तसेच पुन्हा नवे आंदोलक मुंबईत येऊ देऊ नका आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रकृतीची काळजी घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले.

Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Maratha Reservation : मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे हायकोर्टाचे आदेश

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

कोर्टाने म्हटले की,

आझाद मैदानात ५ हजार व्यतिरिक्त अन्य लोकांच्या उपस्थितीत आंदोलन नको जेणेकरून सामान्य मुंबईकरांना त्रास होईल. मुंबईतल्या सामान्य मुंबईकरांचे आयुष्य पूर्व पदावर यायला हवे. गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको. त्यामुळे आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका, त्यांना बाहेरच ठेवा. तसेच जे आंदोलक रस्त्यावर आहेत त्यांना हटवा, पुढील 24 तासांमध्ये ही कारवाई करा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च

आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा (Maratha Reservation)

मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोंच्या संख्येने येत असतील तर अश्या सर्व आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा. मात्र जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी कोर्टाने दिली आहे. तसेच जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्यास त्यांना तत्काळ उपचार द्या, 5 हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून पुन्हा परवानगी द्यायची असल्यास द्या, मात्र नियम आणि अटी यांच पालन करावच लागेल असं कोर्टाने म्हटलं आहे.