Reservation: नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मार्गात जो आडवा येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू द्यायचा नाही, वेळ येईल तेव्हा आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यांची नावंही सांगणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाच्या विरोधात असलेल्यांवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांची आज परभणीतील (Parbhani) सेलूमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या मनोज जरांगेंचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरु आहे. याचवेळी जरांगे यांनी मराठा आरक्षणात अडथळा आणणाऱ्यांना इशारा (Warning) दिला आहे.
नक्की वाचा : अयाेध्येतील श्रीरामाच्या दरबारासाठी तब्बल इतक्या किलाेची महाकाय घंटा; देशभरात चर्चा
जरांगे पुढे म्हणाले की, करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले आहेत. ही लाट आता साधी नाही. तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही. धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमक्या आम्ही देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाही प्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, मराठ्यांनी ८० टक्के लढाई जिंकली आहे,असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात पुढील ४८ तासात थंडी वाढणार
‘अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनावर हल्ला करण्यात आला. माता-भगिनींच्या डोक्याच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या. मांडीवर चार महिन्यांचं लेकरू घेऊन बसलेल्या महिलेचं डोकं फुटलं.” त्या महिलांना इतकं काय केलं होतं की, सरकारने इतका भीषण हल्ला केला, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याचं उत्तर अजून सरकारला देता आलेलं नाही, असं म्हणत जरांगे यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सगळे निकष असूनही मराठ्यांना आरक्षण का देत नाही, असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला आहे. तुम्हाला नोटिसा द्यायला काय होतंय. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही,असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिला.