Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक

Maratha Reservation : नगर : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणा (Maratha Reservation) साठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपाेषण सुरू केले आहे.

0
Maratha Reservation

Maratha Reservation : नगर : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणा (Maratha Reservation) साठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपाेषण सुरू केले आहे. आज त्या उपाेषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदाेलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बुधवारी (ता. १४) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यानंतरही राज्य सरकारला (State Govt) जाग आली नाही, तर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक गाेरख दळवी यांनी दिली.

Maratha Reservation

हेही वाचा : माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न : मनोज जरांगे 

मराठा आरक्षणाची मागणी (Maratha Reservation)

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. १४ तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे. मुंबईतल्या आंदाेलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहे. त्याची अधिसूचना काढली आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे या कायद्याची तत्काळ अंमलबजाणी व्हावी, यासाठी येत्या १४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेसही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत.

अवश्य वाचा : ”कुणबी दाखल्यासाठी जादा पैसे मागितल्यास कारवाई करू”

Maratha Reservation

अन्यथा चक्काजामचा इशारा (Maratha Reservation)

कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगेसोयरेंचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते, पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जीआर दिला. या जीआरची अंमलबजाणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून १४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारने तातडीने अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा तातडीने पारित करावा, अन्यथा महाराष्ट्र बंद नंतर चक्काजाम करण्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here