Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने केली आत्महत्या

खिशामधून आढळली मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी

0
Maratha Reservation

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी माळशेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन (वय २९) या तरुणाने रात्री १० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगोली पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

नोकरी नसल्याने अस्वस्थ (Maratha Reservation)

माळशेलू येथील विलास वामन हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तो सक्रिय सहभाग नोंदवत होता. या तरुणाचं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असून काही दिवसांपासून खासगी दवाखान्यांमध्ये काम करायचा. परंतु नोकरी नसल्याने विलास वामन मागील काही दिवसापासून अस्वस्थ होता. वडिलांना मोटरसायकलवरून सोडण्यासाठी गेला असताना तो मात्र घराकडे परतलाच नाही. वडील रात्री घरी आल्यानंतर विलास घरी न परतल्याने घरच्यांकडून कळाले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली.

नक्की वाचा : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

खिशामधून आढळली चिठ्ठी (Maratha Reservation)

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची मोटरसायकल शेतात आढळून आल्यानंतर परिसरामध्ये पाहणी केली असताना झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. तात्काळ या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली, यावरून पोलीस निरीक्षक विजय राठोड व त्यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली.

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला. त्याच्या खिशामधून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळून आली. या प्रकरणी अद्यापही हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नाही. विलास यांना पत्नी, एक मुलगा, आई वडील असा परिवार असल्याचं सांगण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे माळसेलू गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here